Pathe bapurao biography of christopher
Pathe bapurao biography of christopher powell!
‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव.
पठ्ठे बापूरावांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६६ रोजी सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला.
औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
Pathe bapurao biography of christopher
त्यानंतर गावचे कुळकर्णीपण व जोशीपण त्यांच्याकडे आले. परंतु लहानपणापासूनच त्यांना कवने करण्याचा छंद होता.
वग, गौळणी, पदे, कटाव, झगड्याच्या लावण्या, भेदिक लावण्या असे सारे प्रकार हाताळणार्या बापूरावांच्या लावण्यांची संख्या दोन लाख असल्याचे म्हटले जाते, परंतु पुस्तकरुपाने त्यांच्या फार कमी रचना आज उपलब्ध आहेत, त्याही विविध संकलनवजा संग्रहांमधूनच.
गावातील एका तमाशाच्या फडासाठी त्यांनी लावण्या रचल्या आणि त्या फडाबरोबर तमाशातून गावोगावी पोहोचल्या त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
त्यानंतर व्यवसाय व संसार सोडून त्यांनी स्वतःचा एक फड उभा केला आणि स्वरचित लावण्या पठ्ठे बापूराव या नावाने ते स्वतः गाऊ लागले. गण, गौळण भेदिक’, ‘रंगबाजीच्या, झगड्याचा अशा विविधरंगी लावण्या